demonstrationsofgovernmentemployees

esahas.com

दुसऱ्या दिवशी सुध्दा सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

सातारा जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन नाही तर मतदान नाही, आमच्या मागण्या मान्य करा, कामगार एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली. तसेच शासकीय काम बंद ठेवून निदर्शने केली. यामुळे सलग दुसर्‍या दिवशीही अनेक शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र होते.