demandforrelaxationofrestrictionswithina20kmradiusoftheairport

esahas.com

विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघातील निर्बंध शिथिल करण्याची मागणी

विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघिय क्षेत्रात बांधकामे आणि झाडे लावण्याबाबत निर्बंध घालण्यात आले होते. याबाबत राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधून निर्बंधांबाबत अधिक स्पष्टीकरण व निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर दीपक कपूर यांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणला (एएआय) पत्र पाठवून निर्बंध शिथिल करण्याबाबत विनंती केली आहे.