deepakpawarandshankarmalwadefilenominationsfordistrictbankelections

esahas.com

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दीपक पवार व शंकर माळवदे यांचे अर्ज दाखल

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदचे सदस्य दीपक पवार यांनी प्राथमिक कृषी पथपुरवठा विकास सेवा सोसायटी संस्था जावलीमधून दोन अर्ज दाखल केले आहेत. इतर दोन जणांनीही आज अर्ज भरले असून, बुधवारी 3 वाजेपर्यंत 165 अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.