dazzlingindubaibythegovernmentofmaharashtra.glorytothegiver

esahas.com

दुबईत डॅझलिंग महाराष्ट्र सरकारतर्फे डॉ. दातार यांचा गौरव

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही पुरस्कार मिळाले, तरी कर्मभूमी दुबईत मायभूमी महाराष्ट्राकडून झालेला सन्मान माझ्यासाठी विशेष मोलाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. ही शाबासकीची थाप असून त्यामुळे मला मातृभूमीची सेवा करण्यासाठी अधिक चैतन्य मिळेल, असे प्रतिपादन अल अदिल समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी केले.