daretokillagirlonadesertedroadinthemiddleofthenight

esahas.com

मध्यरात्री सुनसान रस्त्यावर मुलीचे जीवेघेणे धाडस

फलटण -पुसेगाव रस्त्यावर एक 15 ते 16 वर्षीय मुलगी मध्यरात्री 3 ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास पाठीवर सॅक लावून एकटीच निघाली होती. बारामतीचे पत्रकार मच्छिंद्र टिंगरे यांनी मोबाईलवर व्हिडिओ शुटिंग घेत तिची विचारपूस करुन तिला एका वस्तीवरील घरी थांबवले. मात्र, ती कोण होती व तिचे पुढे काय झाले, अशा अनेक प्रश्‍नांची मालिका शनिवारी दुपारी समोर आली पण अल्पवयीन मुलीचे हे धाडस जीवेघेणेही ठरु शकले असते.