contractorsstuckwithbillsofrs4.5crore

esahas.com

ठेकेदारांची अडकली साडेचार कोटी रुपयांची बिले

सातारा पालिकेच्या तिजोरीत वसुलीचा वेग मंदावल्याने पुरता खडखडाट झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले काढताना लेखा विभागाची प्रचंड कसरत होत असून ठेकेदारांच्या गर्दीमुळे येथील कर्मचारी घायकुतीला आले आहेत. प्राप्त माहितीनुसार तब्बल साडेचार कोटी रुपयांची बिले ठेकेदारांची अडकून पडली आहेत.