closedhallsopenspacesallowotherculturalevents

esahas.com

बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी

कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्या मार्गदर्शक सुचनेस अधिन राहून अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्हयातील बंदिस्त सभागृहे, मोकळ्या जागेत होणारे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोंबर 2021 पासून परवानगी दिली आहे.