छत्रपती शिवाजी संग्रहालय अद्ययावत सुविधांसह थ्रीडी स्वरूपात तातडीने खुले करावे अन्यथा या विलंबाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसेल तिथे काळे फासले जाईल, असा खळबळजनक इशारा सातारा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेश शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या जागेत ई-बस साठी चार्जिंग स्टेशन उभारण्यास शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज जोरदार विरोध करत तीव्र निदर्शने केली. एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. हे चार्जिंग स्टेशन महामंडळाच्या जागीच करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून विविध दालनांच्या अद्ययावतीकरणाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या कामाचा तब्बल सव्वातीन कोटी रूपयांचा निधी प्रलंबित आहे. सातारा एसटी आगारासमोरील छत्रपती शिवाजी संग्रहालयाची जुनी इमारत मोडकळीस आली असून येथे पुरातत्व विभागाच्या ऐतिहासिक वस्तूंचे मोठे दालनं आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!