cheatinginsatara

esahas.com

साताऱ्यात भामट्यांचा मायलेकींना गंडा

दागिने साफ करण्याच्या बहाण्याने मायलेकींना दोघा भामट्यांनी ७० हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले. दोघा चोरट्यांनी हातचलाखी करून दागिने स्वतःजवळ ठेवले. त्या बदल्यात त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दगड भरून मायलेकींच्या हाती दिले. ही खळबळजनक घटना साताऱ्यातील चिमणपुरा पेठेमध्ये घडली आहे.