burglaryof21housesinonenightinjawalitaluka

esahas.com

जावली तालुक्यात एकाच रात्री 21 घरांची घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असणार्‍या काही गावांत गुरूवारी रात्री एकाच वेळी 21 बंद घराच्या घरफोडी करून रोख रक्कम, सोने आदी साहित्य लंपास केले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या पाच गावातील एकूण 21 बंद घरे फोडली असल्याचे उघडकीस आले आहे.