गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आणि रखडलेला सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव अथक पाठपुराव्यातून मंजूर करणार्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातारा पालिकेच्या आजी, माजी नगरसेवकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान, हद्दवाढ मंजूर झाल्याने पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असून, सातारा शहरासह, त्रिशंकू भागाचा आणि शहरालगतच्या उपनगरांचा झपाट्याने विकास होईल, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!