bothkingsunopposedinthedistrictbank

esahas.com

जिल्हा बँकेत दोन्ही राजे बिनविरोध

राष्ट्रवादीसह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर सातत्याने तोफ डागणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदावर अर्ज माघारीच्या दिवशी बिनविरोध निवड झाली. दरम्यान सोसायटी मतदारसंघातून उदयनराजे यांच्या गटातील उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुद्धा जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे.