beatingofhotelmanageratwadhe

esahas.com

वाढे येथे हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण; सहाजणांवर गुन्हा

सातारा तालुक्यातील वाढे गावच्या हद्दीत एका व्यावसायिकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून त्याला जखमी करत खिशातील अठरा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेवून जीवे मारण्याची धमकी देण्याची तसेच ही भांडणे सोडवायला गेलेल्या एका हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून जखमी करण्याची घटना बुधवार, दि. २२ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.