सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी ची एकरकमी पंधरा टक्के व्याजासह बिलं शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली नाही. तसेच शेतकर्यांना साखर कारखानदार योग्य उसदर देत नाही या मागण्यांवर वारंवार बैठका चर्चेच्या पलीकडे काहीच होत नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सातारा कोरेगाव मार्गावर बेमुदत रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!