जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध करुन देण्यात आली असून यातून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरणारी यात्रा ही सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेची आहे. या यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तळागाळातील प्रत्येकाचा सहभाग असतो. त्यामुळे ही यात्रा आगळीवेगळी असून या यात्रेला विशेष महत्त्व आहे. या यात्रेची ख्याती आणखी वाढावी म्हणून आणि पुसेगावचा विकास आराखडा मार्गी लावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
कोरोना काळात आपल्या सर्वांना एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
वाई शहराच्या विकासामध्ये विद्यमान, माजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष, नगरसेवक-माजी नगरसेवक, यांनी महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांचा आज कृतज्ञता गौरव सोहळा वाई नगरपरिषदेने आयोजित केला आहे. ही कोतुकास्पद बाब आहे. त्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनी घ्यावा, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघिय क्षेत्रात बांधकामे आणि झाडे लावण्याबाबत निर्बंध घालण्यात आले होते. याबाबत राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधून निर्बंधांबाबत अधिक स्पष्टीकरण व निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर दीपक कपूर यांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणला (एएआय) पत्र पाठवून निर्बंध शिथिल करण्याबाबत विनंती केली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघातून सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांचा विजय झाला. त्यांनी ८ मतांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला. हा निकाल जाहीर झाला. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. तसेच सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे जल्लोषी स्वागत केले.
केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत कृषी कायदे रद्ध झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहे. या निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी आज पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली.
सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह