babarajenews

esahas.com

कोरोना लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद

कोरोना महामारला आळा घालण्यासाठी लसीकरण युद्ध पातळीवर सुरु आहे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहे. शासनाच्या निकषानुसार सातार्‍यात लसीकरण सुरु असून लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणसाठी येणार्‍या नागरिकांचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आभार मानले आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन नागरिकांना केले. 

esahas.com

जिल्हावासियांनी लसीकरण करून कोरोनावर मात करावी

केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सातारा-जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लस पूर्णपणे सुरक्षित असून, कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्या निकषात बसणार्‍या सर्व जिल्हावासियांनी कोरोनावरील लस घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.