अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती.
साताऱ्यातील यशस्वी उद्योजिका सौ. वर्षा राजेश भोसले यांचा नुकताच लायन्स क्लबच्या नवदुर्गा पुरस्काराने विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
वन क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धनात उत्कृष्ठ काम करण्यासाठी दिला जाणारा 2018 व 2019 साठीचा छत्रपती शिवाजी महारात वनश्री पुरस्कार पोलीस अधीक्षक समीर शेख यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार समितीच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार पंढरपूरचे तरुण कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर आणि असंघटित क्षेत्रातील बिडी कामगारांच्या महिला नेत्या शारदाताई गुरु पवार यांना देण्यात येणार आहे.
अंधारवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच धोंडीराम बर्गे यांना राजर्षी शाहू सरपंचरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजेंद्र राजपुरे यांनी महाबळेश्वर तालुक्यात बँकेच्या माध्यमातून समाजकारणात व राजकारणात झोकून देऊन काम केले आहे. डोंगराळ व दुर्गम महाबळेश्वर तालुक्याचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. महाबळेश्वरला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या.
कुडाळ, तालुका जावळी येथील युवा लघु चित्रपट निर्माते दिग्दर्शक अरीश इम्तियाज मुजावर यांना zeff प्लस इंटरटेनमेंटच्या तर्फे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये आर. जे. केराबाई ही डॉक्युमेंटरी नामांकित होऊन हरीश मुजावर यांना आज पुणे येथे गौरविण्यात आले.
बावडा, ता. खंडाळा या गावचे सुपूत्र तथा ध्येयनिष्ठ शास्त्रज्ञ, ऊस संशोधक आणि उत्तम प्राध्यापक असणार्या डॉ. सुरेश मारुती पवार यांना यंदाचा द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो. तर्फे 2022 चा लाईफ टाईम ऍचिव्हमेंट पुरस्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले.
पुसेगाव तालुका खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगावच्या ग्रामीण भागामध्ये संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर अंबादास कदम यांनी 22 वर्ष स्त्री रोग तज्ञ म्हणून अहोरात्र सेवा दिली. या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिली.
कोल्हापूरच्या एका तरुण इंजिनियरने आपलं नाव जागतिक स्पर्धेत उंचावलं आहे. कोल्हापूरच्या एका तरुण इंजिनियरने आपलं नाव जागतिक स्पर्धेत उंचावलं आहे. ऍपल कंपनीने 'शॉट ऑन आयफोन' ही फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती
विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तळागळातील शास्त्रज्ञ अशी डॉ. राजवंशी यांची ओळख आहे. निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) चे ते संचालक आहेत. डॉ. राजवंशी यांनी अक्षय ऊर्जा संशोधन, ग्रामीण आणि सतत विकास याविषयांवर त्यांचा तीस वर्षापेक्षा अधिक अभ्यास आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या क्रांतीकारक महापुरुषाला जन्म देणाऱ्या महामाता भीमाबाई यांच्या नावाचा पुरस्कार ज्ञान दिव्याला ऊर्जा देणारा व माझ्या उर्वरित कार्याला प्रेरणाबळ देणारा आहे, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सामाजिक कार्यकर्त्या, माणदेशी फौंडेशन व माणदेशी महिला सहकारी बॅंकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा समोर ठेवून सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष गौरव पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार 6000 बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या डॉक्टर पी. डी. जोशी पाटोदेकर नांदेड यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार समारोह समितीच्या प्रमुख मार्गदर्शक अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.
ओंड शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार यावर्षी ओंड गावचे युवा उद्योजक संतोष सुतार यांना जाहीर झाला होता. छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख प्रा. दिनकरराव थोरात यांच्या हस्ते नुकताच त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा 'कराड गौरव पुरस्कार वितरण समारंभ व मुकुंद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आत्मकथनपर 'रंगपट' या ग्रंथाचे प्रकाशन असा संयुक्तिक सोहळा गुरुवारी 30 रोजी येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह येथे संपन्न होणार आहे.
मुख्यतः यापूर्वी कारखान्यास उत्तम ऊस विकास पुरस्कार, उच्च तांत्रिक क्षमता पुरस्कार, उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज ने अनेकवेळा सह्याद्रि कारखान्याचा गौरव केलेला आहे. तर राज्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे यांनीही उत्तम आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देवून कारखान्यास सन्मानित केले आहे.
वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर (सातारा), अतुल देऊळगावकर (लातूर) व डॉ. गजानन अपिने (पुणे ) यांची निवड करण्यात आली व जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता देसाई (पुणे) यांची घोषणा करण्यात येत आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ व दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.
सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी गौरवास्पद अशी कामगिरी सातारा जिल्ह्यातील गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांनी केली आहे. गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारात नवनवीन विक्रम करणाऱ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आले आहेत.
बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व दलित आदिवासी क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक (चांदवड) येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे होते. शिवाय, त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. तेव्हा विविध स्तरातील मान्यवरांना पुरस्कार मिळाले. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार व दौंड तालुकाध्यक्ष सचिनभाऊ खरात यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सातारा पालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार उदयनराजें भोसले यांच्या हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता पार पडला.
येथील प्राथमिक शिक्षक विजयकुमार मोहनराव बाचल यांना चेन्नई येथील कलाम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा इंटरनॅशनल गोल्डन टीचर अॅवॉर्ड प्रदान करण्यात आला. चेन्नईत आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती गणेशकुमारन, सिनेअभिनेते विजयकुमारन आदींच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला.
सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल येथील दि वाई अर्बन को ऑप. बँकेचे अध्यक्ष सीए चंद्रकांत काळे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लेक्सिकॉन भारत लीडरशीप अॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.