arrearsonmunicipalradar!

esahas.com

थकबाकीदार पालिकेच्या रडारवर!

नगरपालिकेला चुना लावणाऱ्यासह तब्बल दहा हजार थकबाकीदारांना वसूली व कारवाईची नोटीस पाठविण्याच्या हालचाली वसूली विभागात सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांतच या नोटीसा धाडल्या जाणार असून, कारवाई टाळण्यासाठी थकबाकी जमा करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.