around38lakhworthofgoodsseizedincluding6gavathikattesand30livecartridges

esahas.com

कराड कडे नेण्यात येणाऱ्या 6 गावठी कट्टे आणि 30 जिवंत काडतुसांसह सुमारे 38 लाखांचा मुद्देमाल जप्त...!!

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत सहा गावठी बनावटीचे कट्टे, 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 38 लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 34 प्रमाणे आर्म्स अॅक्ट 3/25, 7/25 अंतर्गत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.