appealtocontact63accountholdersregardingrehabilitationofvelevillage

esahas.com

वेळे गावाच्या पुनर्वसनाबाबत 63 खातेदारांनी संपर्क साधण्याचे आवाहन

सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमधील मौजे वेळे ता.जावली जि. सातारा या गावचे पुनर्वसन होणार हे निश्चित आहे. तरी  वेळे गावातील संबंधितांनी पुनर्वसनकामी उपवनसंरक्षक (प्रा) सातारा या कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा. वेळेत संपर्क न साधल्यास, पुनर्वसन प्रक्रियेस विलंब झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे प्रकल्प अधिकारी तथा उपवन संरक्षक एम. एन. मोहिते यांनी कळविले आहे.