appealfordivyangstudentstoapplyonnationalscholarshipportal

esahas.com

दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन : डॉ. सपना घोळवे

भारत सरकार सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय विकलांग व्यक्ती विभागाकडून दिव्यांग व्यक्तींकरिता महत्वाच्या सहा शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केल्या आहेत. या केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी  इ. 9 वी ते महाविद्यालयीन विभागात शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून संबंधित संस्थांनी दि. 15 डिसेंबर पर्यंत अर्ज पडताळणी करणे आवश्यक आहे.