anandotsavatallindiaradioduetoinclusionintheboundary

esahas.com

हद्दवाढीत समावेश झाल्याने आकाशवाणी येथे आनंदोत्सव 

सातारा शहराच्या हद्दवाढीमध्ये त्रिशंकू भागातील आकाशवाणी झोपडपट्टीचा समावेश झाला. हद्दवाढ मंजूर करून त्रिशंकू भागाला विकासाची कवाडे खुली करुन दिल्याबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अभिनंदन करत आकाशवाणी येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हद्दवाढ मंजूर केल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानन्यात आले.