afterthedeathofhermotherchimukalitookovertheresponsibilityofthefamily

esahas.com

आईच्या निधनानंतर चिमुकलीने घेतली कुटुंबाची जबाबदारी, पण मद्यपी वडिलांच्या त्रासाला कंटाळून संपवले जीवन

आईच्या निधनानंतर लहान वयातच १५ वर्षांच्या मुलीने कुटुंबाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेतली. मात्र, वडील सतत दारू पिऊन तरर्र असल्याने मुलगी वडिलांच्या त्रासाला कंटाळली. त्यामुळे तिने यातून सुटका व्हावी म्हणून विहिरीत उडी टाकून आपले आयुष्य संपविले. मानसी संतोष डाडर (वय १५, मूळ रा. नागलवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर, सध्या रा. आंबेवाडी, ता. सातारा) असे या मृत मुलीचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलीय.