actiontakenagainstfourforcuttingdowntreeswithoutpermissionatatali

esahas.com

आटाळी, शिवथर येथे विनापरवाना वृक्षतोड केल्यावरून चौघांवर कारवाई

दि. ८ नोव्हेंबर रोजी आटाळी गावच्या हद्दीत आकाश बाचल यांच्या जमिनी मध्ये विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता अतित, ता. सातारा येथील बाळासाहेब लोहार या लाकूड व्यापाऱ्याकडून बेकायदेशीर विनापरवाना वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी आकाश बाचल आणि बाळासाहेब लोहार या दोघांवर वन विभागाच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.