पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतलेले असून संसदेत त्याबाबतचे विधेयक आणून तसा कायदेशीर निर्णय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन आपल्या घरी जावे. पण तरीही आंदोलन सुरूच ठेवले जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
सदर बझार येथील हनुमान मंदिर याठिकाणी काही समाजकंटकांकडून हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मूर्ती विटंबना करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर भारतीय जनता पार्टी व हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व त्यांचे सहकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन दुग्धाभिषेक करून मूर्तीचे शुद्धीकरण केले व महाआरती करण्यात आली.
येथील धर्मादाय व शासकीय विभागाशी निगडित अनुदानाचा लाभ उठवणार्या हॉस्पिटलचे कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणार्या डॉक्टर व राजकीय पुढार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी प्रांताधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!