‘वनांना वारंवार लागणारी आग (वणवे) रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे, हे समाजाला वनविभागाने पटवून देऊन वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परंतु, हे काम करत असताना कोणी गावचे राजकारण पुढे आणू नका, असे करणार्याला पाप लागेल,’ असे मत खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी व्यक्त केले.
‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असा रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.
‘जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांना टेस्ट करून घेऊनच दुकानात बसावे, अशा टेस्ट करण्यासाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे तसेच लस देण्याचा वेग वाढवावा,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
पुणे येथे विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये आढावा बैठक संपन्न झाली.
‘सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2021-2022 मूळ 264 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यात 110.50 कोटी वाढ करून 375 कोटी रुपयांच्या निधीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती देऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सातारा शहरात सैनिक स्कूल सुरू झाले आहे. या सैनिक स्कूलचा राज्यासह देशात नावलौकिक वाढावा यासाठी येथील इमारती व इतर कामांसाठी वेगळ्या निधीची तरदूत अर्थ संकल्पात करण्यात येईल,’ अशी ग्वाहीही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवा
‘जल जीवन मिशन अंतर्गत माण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कुटुंबांना तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे,’ असे आवाहन जिल्हा परिषद साताराचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केले.