ayoungwomanwaskilledwhenhertwowheelerhitanunidentifiedvehicle

esahas.com

दुचाकीची अज्ञात वाहनाला धडक बसून युवती ठार

नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवतीचा रस्त्यावर आदळून जागीच मृत्यू झाला. तर तीन वर्षाच्या मुलीसह युवक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी २४ रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.