ahugefirebrokeoutatdevdharwadainshaniwarpeth

esahas.com

शनिवार पेठेतील देवधर वाड्याला भीषण आग

अदालत वाडा परिसरातील शनिवार पेठेत खळग्या मारुती समोर असणाऱ्या देवधर वाड्याला मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता भीषण आग लागून या वाड्याचे मोठे नुकसान झाले. या आगीमध्ये इलेक्ट्रिक साहित्य तसेच संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी झाली नाही. मात्र या वाड्यात राहणाऱ्या देवधर कुटुंबियांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.