सातारा-कोरेगाव रस्त्यावरील शहरालगत संगमनगर येथे पोलिसांच्या आयशर व्हॅनने दोन दुचाकींना धडक दिल्यानंतर त्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून अन्य दोघांना दुखापत झाली आहे. बेदरकारपणे चालवणार्या पोलिसाने मद्यप्राशन केले असल्याचा उल्लेखही तक्रारीत झाल्याने खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात व्हॅनवरील पोलिस चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!