लोणी–काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार देशातील सर्वच नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे. त्यानुसार पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. नदीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, तसेच थेट नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा या अत्यंत गंभीर बाबींची नोंद सरकार घेत आहे. भविष्यात स्थानिक महापालि...
1 ऑगस्ट 2025 पासून UPI चे नवीन नियम लागू होतील. जर तुम्ही Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI अॅपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर तुम्हाला या बदलांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. चला तर मग कोणते नवीन नियम लागू केले आहेत याबद्दल जाणून घेऊयात...
भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे द्वारा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 जानेवारी2025 रोजी ‘स्टँडर्ड्स कॉन्क्लेव – औद्योगिक संगोष्ठि’ चे होटल लेमन ट्री येथे आयोजनकेले. या कार्यक्रमात औद्योगिक जगतातील व्यक्तींनी, विविध प्रयोगशाळांनी व सरकारीविभागातील अधिकारी यांनी उपस्थिति लावली व कार्यक्रमात 100 हून अधिक प्रतिनिधींनीउत्साहाने सहभाग घेतला.
"मराठ्यांमुळे राज्यात सरकार आले आहे, कुण्या आमदाराने म्हणावे आम्हाला मराठ्यांनी मतदान केले नाही. मी सरकारबाबत अशावादी आहे. आमचे समीकरण जुळले नाही, म्हणून नाही तर सुफडा साफ झाला असता. मी लोकसभेला आणि विधानसभेला म्हणलो नाही की, याला पाडा किंवा त्याला पाडा" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पुणे, दि.1 फेब्रुवारी 24सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय चार वर्षांत एकदा होणाऱ्या या कार्यक्रमासाठी एकत्र येत असल्यामुळे, या शानदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे दिसून येत होते. या सोहळ्यासाठी उपस्थित नामवंत पाहुण्यांमध्ये अनेक सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह, परमवीर चक्रान...
सध्या भारतातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. आज आम्ही तुम्हाला या ऋतूत कोणत्या 4 गोष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया अशा 4 गोष्टी ज्या पावसाळ्यात खाल्ल्या तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं किंवा तुम्ही आजारीही पडू शकता.
गृहमंत्री दौऱ्यावर असताना कारागृहातून पळून गेलेल्या दरोडेखोरांच्या टोळीवर वडूज पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ‘मोक्का’ लावण्यात आला आहे. या टोळीवर औंध, उंब्रज, पुणे, बीड, नगर जिल्ह्यांत दरोडे, जबरी चोरी, मारामारी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकाच टोळीवर एका आठवड्यात मोकांतर्गत करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे.
बदलती जीवनशैली, तळळेले किंवा मसालेदार पदार्थ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे अनेकदा अॅसिडिटी (Acidity) किंवा आम्लपित्ताची समस्या त्रास द्यायला लागते. छातीत आणि पोटात जळजळ अशा समस्या दररोज त्रास देतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि त्वरित आराम मिळवण्यासाठी बरेच लोक औषधे घेतात. मात्र, डॉक्टरांना न सांगता अशी औषधे घेतल्याने आरोग्याला हानी पोहोचते.तसेच, रसायनयुक्त औषधे देखील बहुतेक प्रकरणांमध्ये काही दुष्परिणाम दाखवतात.
KGF 2 Box Office Collection : यश व्यतिरिक्त या चित्रपटात संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसले आहेत.
जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवल्यानंतर काहीच वेळात 'किंग रिचर्ड' मधील आपल्या भूमिकेसाठी विल स्मिथला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड जाहीर झाला. याचदरम्यान मंचावर जात स्मिथने ख्रिस रॉकला कानशिलात लगावली.
मानवी पार्थिवाच्या दहनासाठी कोट्यावधी वृक्षांची कत्तल होते. याला पर्याय म्हणून झाडांचा पडलेला पालापाचोळा, ऊसाच्या चोयट्या, बगॅस आदी. बायोवेस्टमधून ‘अग्निकाष्ठ’ नावाचे सरपण उपलब्ध करण्यात आले आहे. या सरपणामुळे लाकडाची बचत होणार असून पर्यायाने वृक्षतोड थांबून पर्यावरणाचा र्हास टळणार आहे. यासाठी मानवी पार्थिवाच्या दहनासाठी ‘अग्निकाष्ठ’ सरपण वापरावे, असे आवाहन अग्निकाष्ठ सरण समितीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
आज जागतिक महासत्ता होऊन पाहणाऱ्या देशांच्या शर्यतीत हा रशिया प्रबळ दावेदार आहे. जगातील सगळ्यात मोठा देश असलेल्या या राष्ट्राला सांभाळणे म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही. या देशाचा सर्वोच्च व्यक्ती देखील तितकाच कठोर असला पाहिजे आणि याबाबतीत रशियाने नशीब काढले असे म्हणावे लागेल! कारण जगातील सर्वात धाडसी आणि महत्त्वकांक्षी राष्ट्रपती वाल्दीमिर पुतीन त्यांच्याकडे आहेत.
सातारा शहरामध्ये सातारा नगरपालिका आणि सातारा वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नो मास्क, नो व्हेईकल’ ही मोहीम शुक्रवारपासून राबवण्यात आली या मोहिमेमध्ये मास्क नसणार्या वीस पादचारी आणि तीस वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दोन्ही कारवायांमध्ये एकूण तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सातारा जिह्यातून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग असे तब्बल पाच गुन्हे दाखल असलेला प्रमोद उर्फ बाळा काशिनाथ सकट (प्रतापसिंहनगर) याला सातारा जिह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आले आहे.
म्हसवड येथील पुळकोटी रस्त्यावर भोरे व्यापार संकुल येथे खवैय्यांसाठी दादाज् चायनीज या हॉटेलचा शुभारंभ इंजि.सुनील पोरे यांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ वाढवून तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
अंजीर खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अगणित फायदे होतात. हे वजन कमी करण्यासोबतच लिवर, बद्धकोष्ठता, त्वचा आणि कमकुवत हाडांशी संबंधित प्रत्येक समस्या दूर करते.
अंजीर खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी अगणित फायदे होतात. हे वजन कमी करण्यासोबतच लिवर, बद्धकोष्ठता, त्वचा आणि कमकुवत हाडांशी संबंधित प्रत्येक समस्या दूर करते.
नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजेच ‘सौ चुहे खाकर..बिल्ली हज को चली,’ अशी अवस्था ‘त्या’ बारा नगरसेवकांची झाली असून, त्यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे नंतर नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावे, असा प्रतिटोला नगरसेवक कुमार शिंदे ऑनलाइन सभेस विरोध केलेल्या ‘त्या’ बारा नगरसेवकांना लगावला आहे.
‘कोरोनामुक्ती’मध्ये आपल्याला चांगले यश मिळत आहे. सातारा जिल्ह्याने आठ हजार पेक्षा जास्त रुग्णांना बरे केले आहे. देशात हा विचार केला तर 28 लाखांचा टप्पा आपण गाठला आहे.आपल्या महाराष्ट्रात तब्बल सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण चित्र दिलासादायक आहे. आता गाफीलपणा बाळगू नये, सर्व प्रकारची काळजी घ्यावी,’ असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी एका पत्रकाद्वारे केले.
कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी ‘भाजपाचा जिल्हा महिला मोर्चा’च्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व
पाचगणी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने स्वतःची अनोखी अशी यंत्रणा आज राबवल्याने पालिकेच्या कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत पाचगणीसह ग्रामीण भागात कसल्याही वाद्यांचा निनाद न करता शांततेने आणि उत्साहात घरगुती गणेशाचे विसर्जन पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात आज गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.