cineworld

Kaun Pravin Tambe : 'कौन प्रवीण तांबे' सिनेमात मराठमोळा श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत


Kaun Pravin Tambe: Marathmola Shreyas Talpade in lead role in 'Kaun Praveen Tambe'
'कौन प्रवीण तांबे' सिनेमात अभिनेता श्रेयस तळपदे प्रवीण तांबेची भूमिका साकारणार आहे.

मराठमोळा अभिनेता  श्रेयस तळपदे (Shreyas Talapade) 'कौन प्रवीण तांबे?' या बायोपिकमध्ये झळकणार आहे. निर्मात्यांनी नुकतेच सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. हा सिनेमा 1 एप्रिल रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

प्रवीण तांबेच्या भूमिकेबद्दल श्रेयस म्हणाला, मी खूप भाग्यवान आहे. मला मोठ्या पडद्यावर प्रवीणची भूमिका साकारायला मिळत आहे. जयप्रद देसाई यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. श्रेयससोबत या सिनेमात आशिष विद्यार्थी, परम्ब्रता चॅटर्जी आणि अंजली पाटीलदेखील मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन जयप्रद देसाई (Jayprad Desai) यांनी केले आहे. 
कौन प्रवीण तांबे?' हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 9 मार्चला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयस जवळपास 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी तो ‘इक्बाल’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रवीण तांबेंची भूमिका साकारण्यासाठी श्रेयसने खूप मेहनत घेतली आहे.