cineworld

आंब्रळ येथे रक्तदान शिबिर 50 रक्तदात्यांनी केलं रक्तदान

ग्रामस्थ व अक्षय ब्लड बँक याच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

पाचगणी, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अपुर्‍या रक्त साठ्याची समस्या निर्माण झाली आहे.नागरिकांचे आरोग्य व सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून अनेक ठिकाणी स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत.
हीच बाब लक्षात घेऊन उदात्त भावनेने ग्रामस्थ मंडळ आंब्रळ, राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंच आंब्रळ आणि ‘अक्षय ब्लड बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये 50 रक्तदात्यांनी  रक्तदान करून सहभाग नोंदवला. या शिबीरात आंब्रळमधील महिला, युवा तरुणांनी उस्फुर्तपणे सहभाग घेत यात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदात्यांना रक्तदानप्रती प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 
यावेळी जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, सरपंच माधुरी आंब्राळे, उपसरपंच उमेश जाधव, सर्व सदस्य, गुलाब आंब्राळे, दिलीप आंब्राळे, युवा वर्ग, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.