cineworld

छ शिवाजी महाराजांना ना. एकनाथ शिंदेकडून अभिवादन


महाबळेश्‍वर,  ः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनानिमित्त येथील मुख्य छ. शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महाबळेश्‍वर तालुक्याचे सुपुत्र व राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यासह आ. मकरंदआबा पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक कुमार शिंदे, संजय पिसाळ, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, शिवसेनेचे विजय नायडू, शहरप्रमुख राजा गुजर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्तात्रयभाऊ वाडकर, अर्बन बँकेचे अध्यक्ष सचिन धोत्रे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण जिमन, लिलाताई शिंदे, राजश्री भिसे, वनिता जाधव, सचिन गुजर, आकाश साळुंखे, गोपाळ लालबेग, सतीश ओंबळे, राजेंद्र पंडित, उस्मान खारकांडे आदी उपस्थित होते.