cineworld

‘जय मल्हार’चा शेकडो कुटुंबांना आधार


वडूज,  : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर वडूज परिसरातील सर्व व्यवसाय ठप्प आहेत. अशा परस्थितीत दररोज मोलमजूरी करुन जीवन जगणार्‍या अनेक कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह अडचणीत आला आहे. अशा शेकडो कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप करुन येथील जय मल्हार करीअर अ‍ॅकॅडमीच्या वतीने आधार देण्यात आला.
अ‍ॅकॅडमीचे संस्थापक बनाजी पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून हे वाटप करण्यात आले. माजी उपसरपंच शशिकांत पाटोळे, संस्थापक बनाजी पाटोळे यांच्याहस्ते हे वाटप करण्यात आले. यावेळी समर्पण पाटोळे, वैष्णवी पाटोळे, प्रकाश पाटोळे, बापू जाधव,  अमित जाधव, आशिष जोशी,  दिपक बोडरे, सागर गुजले, जयसिंग पाटोळे, आनंदा पाटोळे, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
कोरोना नियमानुसार सोशल डिस्टन्स व शासनाचे सर्व नियम पाळून हे वाटप करण्यात आले. हमाली व मजूरी करणार्‍या कुटुंबियांना हे वाटप करण्यात आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तर या विधायक उपक्रमाबद्दल समाजातील मान्यवरांनी पाटोळे व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक केले. व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जतन करण्याच्या उपक्रमाचे इतर संस्थांनी आदर्श घेण्याची अपेक्षा व्यक्त झाली.