कोरोना काळात नागरिकांचे सहकार्य अधिक महत्त्वाचे 

अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिपादन

‘सातारा जिल्ह्यात तब्बल 2,677 इतके रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यंत्रणा संपूर्ण सतर्क आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जनतेची साथ आता अत्यंत महत्त्वाची आहे,’ असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

सातारा : ‘सातारा जिल्ह्यात तब्बल 2,677 इतके रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. यंत्रणा संपूर्ण सतर्क आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जनतेची साथ आता अत्यंत महत्त्वाची आहे,’ असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 
सुशिक्षित नागरिकांनी तसेच इतर घटकांनी प्रबोधनाला हात द्यावा, प्रबोधनासाठी जिल्हा परिषदेतर्फे अनेक प्रकारची पुस्तके, माहितीपत्रके प्रसारित करण्यात आली आहेत. त्याचे गावपातळीवर वाचन होणे गरजेचे आहे. प्रादुर्भाव वाढत असला तरी नियम पाळल्यास चिंता करण्याचे कारण नाही.कोरोनामुक्तीची संख्याही लक्षणीय आहे. 2600 हून अधिक रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत. सर्वच आरोग्य कर्मचारी, अधिकारी तसेच इतर विभागांतील अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस काटेकोर नियोजन करून प्रतिबंधासाठी झटत आहेत. काटेकोरपणे नियम पाळले जाणे गरजेचे आहे.
विषाणूच्या प्रभावाची साखळी तुटण्यासाठी कठोरपणे प्रशासनाने घालून दिलेले नियम सांभाळले पाहिजेत. सातत्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार हात धुणे या बाबींवर कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. सर्व कर्मचार्‍यांना गावपातळीवर सहकार्य करावे.
ग्रामसुरक्षा समिती आणि शहरातील प्रभाग समिती यांना सर्व नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे. आयुष मंत्रालय यांनी दिलेल्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना पाळाव्यात आणि कुटुंबात अवलंबावे. रोज अर्धा तास ध्यानधारणा, योगासने करणे, आयुर्वेदिक काढा, चवणप्राश घेणे, अर्सेनिक अल्बम गोळ्यांचा कोर्स करणे आदी बाबी कौटुंबिक पातळीवर अवश्य कराव्यात, त्याचा देखील प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी खूप फायदा आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सतत चिंता करण्यापेक्षा सर्व नियम काटेकोरपणे पाळून आपले सामाजिक कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. विनाकारण गर्दी करू नये. कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नये. आरोग्य असो की महसूल पोलीस कर्मचारी सर्वांनाच सहकार्य करावे. 
जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष अविरतपणे गेले चार महिन्यांपेक्षा अधिक काळ नियोजनबद्ध उपाययोजना करीत आहे. समाजातील सर्वच घटकांनी या प्रयत्नांना मनापासून सहकार्य करावे, असे देखील पत्रकात नमूद करण्यात आले आहे.