वडूज : वंजारी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुधाकर मुंढें यांची निवड झाली आहे. संघटनेच्या संघटक पदावर असताना मुंढे यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सेवा संघाचे अतिशय चांगल्या प्रकारे बांधणी करुन संघ मजबूत करुन स्व. मुंढेसाहेबांचे कार्य तळागाळातील समाज बांधवासाठी काम केले. त्यांच्या कार्याची कार्यकारणीने दखल घेवुन त्यांची राज्य उपाध्यक्ष पदी बढती देण्यात आली आहे.
मुंढे हे धनगर समाजाच्या यशवंत ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी समाजबांधवासाठी मनमंदिर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, कोल्हापूर” या संस्थेची स्थापन केली. तसेच सर्व समाजातील व्यसनी लोकांसाठी कराड, मलकापूर येथे आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर, प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव गिते, कार्याध्यक्ष देवेंद्र बारगजे, बाजी दराडे, राज्य महिला अध्यक्षा डॉ. मंजुषाताई दराडे, विभागीय अध्यक्ष मानसिंगराव माळवे, अॅड. सुनिल गंबरे, अरुण खरमाटे आदींनी आभिनंदन केले.