दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तामजाई नगर, सातारा येथील अंतरिक्ष हाइट्स नावाच्या अपार्टमेंटच्या जवळ विक्रम तानाजी खवले वय 20, रा. वाघजाई मंदिराच्या शेजारी सैदापूर, ता. सातारा हा आपला चेहरा झाकून, स्वतःचे अस्तित्व लपवून कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असलेला सापडला.
दुसऱ्या घटनेत तामजाई नगर येथील पोद्दार शाळे शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात तेथीलच विष्णू रामू मसुरकर वय 18 हा आपला चेहरा झाकून कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असलेला सापडला. या दोघांवरही शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


