cineworld

मंगेश पोमणच्या खुनात वापरलेली दोन पिस्टल्स हस्तगत

लोणंद पोलीस स्टेशनची कारवाई

वाठार बुद्रुक  येथे मंगेश पोमण याचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. या खुनात वापरलेली गावठी बनावटीची दोन पिस्टल तसेच एक जिवंत रांऊड व पल्सर मोटार सायकल लोणंद पोलिसांनी जप्त केली आहेत. 

लोणंद ः वाठार बुद्रुक  येथे मंगेश पोमण याचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. या खुनात वापरलेली गावठी बनावटीची दोन पिस्टल तसेच एक जिवंत रांऊड व पल्सर मोटार सायकल लोणंद पोलिसांनी जप्त केली आहेत. 

याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 8 रोजी लोणंद पोलीस ठाणे हद्दीत वाठार बुद्रुक, ता. खंडाळा गावचे हद्दीतील निरा उजवा कॅनॉलमध्ये अनोळखी इसमाचे प्रेत मिळून आल्यावरुन लोणंद पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू रजि नोंद करण्यात आली होती. मयताचे तपासमध्ये मयत मंगेश सुरेंद्र पोमण वय 35 वर्षे रा.पोमणनगर पिंपळे, ता. पुरंदर जि. पुणे याचा अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरुन खुन करुन प्रेताचे अंगावरील कपडे काढुन ते फेकुन देवुन पुरावा नाहीसा केल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत लोणंद पोलीस ठाणेस खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.  गुन्हयातील आरोपी वैभव सुभाष जगताप रा.पांगारे ता.पुरंदर यास यापुर्वी अटक करण्यात आली असुन त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. दरम्यान गुन्हयातील मुख्य कुख्यात गुंड, तडीपार आरोपी ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे, रा. कुडजे ता. हवेली जि.पुणे हा गुन्हा घडले पासुन पोलिसांना गुंगारा देत होता. त्याची माहिती विशाल के.वायकर सहायक पोलीस निरीक्षक, लोणंद यांनी माहिती काढुन त्याला नाशिकमधून स्थानिक पोलिसाचे मदतीने ताब्यात घेवून दि. 14 रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता तो पुणे येथुन तडीपार असून त्याच्याकडून कुडजे, पुणे येथून खुनाचे गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे दोन पिस्टल, एक जिवंत रांऊड व पल्सर मोटार सायकल असे जप्त करण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, , उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे  यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजीत धनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, फैयाज शेख, गोविंद आंधळे, केतन लाळगे, चालक मल्हारी भिसे यांनी ही कारवाई केली.