cineworld

प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांच्या हस्ते लोणंद येथे वृक्षारोपण


लोणंद,  ः जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून लोणंद येथील कोविड केअर सेंटर असलेल्या शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या परिसरात प्रांताधिकारी संगीता राजापुरे चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
जागतिक पर्यावरण दिवस दिवसाचे औचित्य साधून वसुंधरेचे संवर्धन होण्यासाठी पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असते. लोणंद येथेही जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या परिसरात प्रांताधिकारी संगीता राजापुरे चौगुले, लोणंदचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. 
यावेळी माजी अध्यक्ष डॉ अनिल राजे निंबाळकर, उपाध्यक्ष डॉ. दीपक पवार, सचिव डॉ. रोहन रावखंडे, लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश दानी, माजी अध्यक्ष डॉ. मिलिंद काकडे, डॉ. अवधूत किकले प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंदचे डॉ. प्रशांत बागडे तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष  दयाभाऊ खरात, लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके, नगरसेवक हनुमंत शेळके, सागर शेळके, गजेंद्र मुसळे, डॉ. स्वाती शहा, डॉ. मेघा रावखंडे, डॉ. संजीव पवार, डॉ. मनोज निकम, डॉ. दिलीप येळे, नगरपंचायत लोणंदचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.