एकंदरीतच मिस्टर रामराजेंसारखा गद्दार आणि लाचार पंटर फलटण तालुक्याला मिळाला होता, अशी घणाघाती टीका खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मिस्टर रामराजेंवर नाव न घेता केली आहे.
रणजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मला टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवायचा नाही, मला फलटण तालुक्याचा विकास करायचा आहे, असे सांगून विरोधकांना चितपट केले व त्यांच्या या शब्दाने तालुक्यातील जनतेची मने जिंकली आहेत.
बारामती व फलटण तालुक्याला एकत्रित जोडणारा नीरा नदीवरील पूल सोमेश्वर मंदिरानजिक होणार असल्याने त्याची पाहणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली व या पुलाला निधी देणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
टोळी प्रमुख सुरज बोडरे याने त्याच्या टोळीची दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या बजेटच्या पुरवणी मागणीमध्ये फलटण-बारामती जे रेल्वे कामासाठी 100 कोटी व फलटण पंढरपूर साठी २० कोटी तरतूद बजेटमध्ये करावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेऊन वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी बजेटमध्ये 120 कोटी रुपयांची तरतूद केली.
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
नीरा-देवघर प्रकल्पाला निधी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नागरी सत्कार शनिवार, दि.४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता गजानन चौक, फलटण येथे आयोजित केला असल्याची माहिती जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते, अशोकराव जाधव यांनी दिली आहे.
साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीसाठी आपला पुढाकार घ्यावा यातून निश्चितच शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा लोकसभा मतदार संघातील विकास कामे व रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्याबद्दल फलटण येथे शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी दिली.
मी पालकमंत्री नसताना जिल्ह्याचा विकासाचा निधी फलटण आणि कराडला वळविला जात असल्याचे समजत होतो. मात्र फलटणला पण निधीचा अनुशेष असल्याचे दिसत आहे. हे पाहता जिल्ह्यासाठी मिळणारा निधी कोठे गेला, असा सवाल जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी करताना अप्रत्यक्षरीत्या राष्टवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींना जबाबदार धरले आहे.