मदेव समाजोन्नती परिषद व जनश्री फाऊंडेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने व मे. शुभम भारत गॅस एजन्सी यांच्या सहकार्यातून आयोजित भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व समाजातील तब्बल 161 रक्तदात्यांनी याप्रसंगी रक्तदान केले आहे.
गेल्या दोन वर्षाच्या कोरोनानंतर होत असलेल्या सातारा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला पहिल्याच दिवशी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 9 हजार 117 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली त्यापैकी 1 हजार 412 प्रकरणे निकाली निघाली तसेच वादपूर्व 5 हजार 477 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी तडजोडीने 1 हजार 466 प्रकरणे निकाली निघाली आहेत. 2 मे ते 6 मे 2022 या कालावधीमधील स्पेशल ड्राईव्हमध्ये सातारा जिल्ह्यात एकूण 609 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी दिली
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील पक्षकारांची वाद व वादपूर्व प्रकरणे ही सामंजस्याने व सुसंवादाने तडजोडीने निकाली निघण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 11 हजार 646 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तृप्ती जाधव यांनी दिली.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 12 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ७ रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचार्यांनी या शिबिराचा लाभ घेतला असून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.