इंजि. सुनील पोरे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
तब्बल 161 रक्तदात्यांनी रक्तदान करुन जपली सामाजिक बांधिलकी
मदेव समाजोन्नती परिषद व जनश्री फाऊंडेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने व मे. शुभम भारत गॅस एजन्सी यांच्या सहकार्यातून आयोजित भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व समाजातील तब्बल 161 रक्तदात्यांनी याप्रसंगी रक्तदान केले आहे.
सातारा : नामदेव समाजोन्नती परिषद व जनश्री फाऊंडेशन म्हसवड यांच्या संयुक्त विद्यमाने व मे. शुभम भारत गॅस एजन्सी यांच्या सहकार्यातून आयोजित भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील सर्व समाजातील तब्बल 161 रक्तदात्यांनी याप्रसंगी रक्तदान केले आहे.
शुभारंभ प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भूजबळ, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, शंकर विरकर, मा. उपनगराध्यक्ष दत्ता रोकडे, धनाजी माने, आप्पासाहेब पुकळे, काकासाहेब माने, अण्णा टाकणे, अनिल व्होरा आणि समाज बांधव उपस्थित होते.
कोरोना संसर्गाच्या लाटेमध्ये लोकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले. रक्तदान हेच सर्वोत्तम दान यास अनुसरुन सातारा नामदेव समाजोन्नती परिषद जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी आपल्या कारकीर्दीच्या शुभारंभी केलेल्या रक्तदान शिबीरास कमालीचा प्रतिसाद मिळाला. खाजगी संस्थेने केलेले सर्व उच्चांक मोडीत काढत नवा विक्रम नोंदवला आहे. म्हसवड येथे पोरे कुटुंबातील सदस्यांनी सर्व समाजातील लोकांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले असल्यानेच नवा विक्रम नोंदवू शकले असल्याचे बोलले जात आहे.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी करणभैय्या पोरे, ऍड शुभम पोरे, देविदास पोरे, नगरसेवक संजय सोनवणे, आकाश मेंढापुरे, विशाल गोंजारी, अतुल फुटाणे, प्रकाश डोंगरे, भिकु पोरे, गणेश नामदास, आकाश पिसे, अविनाश चव्हाण, बालाजी ब्लड सेंटर चे डॉ.महेश गायकवाड, पांडूरंग सरक आदींनी परिश्रम घेतले.