आराध्या प्रवीण खुस्पे हिच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त वावरहिरे जिल्हा परिषद शाळा येथे सातारा येथील जरग हॉस्पिटलच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शंभर पेक्षा जास्त लोकांची मोफत तपासणी करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन बबनराव खुस्पे यांनी केले होते.
पाचवड (ता. खटाव) मध्ये शिवजयंतीनिमित्त जाणताराजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुप यांच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रणसिंगवाडी (ता. खटाव) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजन करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख आप्पा घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दहिवडी कॉलेज व अक्षय रक्तपेढी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.