maharashtra

अजित पवार बारामती विमान अपघात : भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील 'दादा' पर्वाचा बारामतीत करुण अंत


Ajit Pawar Baramati plane crash: Deputy Chief Minister Ajit Pawar dies in a horrific accident; 'Dada' era in politics comes to a tragic end in Baramati
अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती.

अजित पवार बारामती विमान अपघातराज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Baramati Plane Crash) यांचे आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. आज (28 जानेवारी) सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग होताना भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवार यांच्याच नावे आहे. राज्याच्या अर्थ खात्याची धुरा सुद्धा त्यांच्याच खांद्यावर होती. प्रशासनावर पकड असलेला धुरंदर नेता, आपल्याला जे पटलं नाही ते बेधकडपणे बोलणारे दादा, कार्यकर्त्यांना जागेवर सुनावणारे दादा, राजकीय विरोधकांनाही त्याच भाषेत सुनावणारे दादा अशा एक नव्हे तर अनेक आठवणी महाराष्ट्राच्या राजकारणात दादांच्या व्यक्तिमत्वाने कोरल्या गेल्या आहेत. महाराष्‍ट्रात याना त्‍या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्‍या काही मोजक्‍याच नेत्‍यांपैकी एक म्‍हणजे अजित पवार.   


व्हीएसआर कंपनीचं खासगी विमान लँडिंग करत असतानाच तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर ते हवेत गोल फिरलं. यानंतर विमान जमिनीवर आदळून त्याचे तुकडे झाले आणि मोठी दुर्घटना घडली ज्यामध्ये अजित पवारांसह सह जणांचा मृत्यू झाला.   

दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त (Ajit Pawar Baramati Plane Crash)

अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या 'दादा' पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चिलं गेलं आहे. त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे.