वन क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धनात उत्कृष्ठ काम करण्यासाठी दिला जाणारा 2018 व 2019 साठीचा छत्रपती शिवाजी महारात वनश्री पुरस्कार पोलीस अधीक्षक समीर शेख यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला आहे.
सातारा : वन क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धनात उत्कृष्ठ काम करण्यासाठी दिला जाणारा 2018 व 2019 साठीचा छत्रपती शिवाजी महारात वनश्री पुरस्कार पोलीस अधीक्षक समीर शेख यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला आहे.
या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितित हा कार्यक्रम संपन्न झाला. पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी येथे पदभार स्विकारल्यानंतरही वृक्षारोपण व संवर्धनाचे काम सुरू ठेवलेले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.