धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे स्वायत्त महाविद्यालय असून ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करता यावे यासाठी बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवले जाते.
सातारा : रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथील सहा विद्यार्थ्यांची कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि. सातारा या बँकेत निवड. सातारा येथील कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि. सातारा या बँकेत ज्युनिअर ऑफिसर या पदावर भारती करण्यासाठी सप्टेबर २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्द करण्यात आलेली होती त्यानुसार सदर पदभरती साठी परीक्षा घेण्यात आलेली होती. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बँकेसाठी ज्युनिअर ऑफिसर या पदासाठी पात्र उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आलेली होती मुलाखतीमधून एकूण २० पात्र उमेदवारांची ज्युनिअर ऑफिसर म्हणून निवड करण्यात आलेली असून या निवडीमध्ये महाविद्यालयाच्या श्री. हृषीकेश बाबर, श्री. गणेश तोडकर, कु. धनश्री देशमाने, कु. ऋतुजा निकम, कु. स्नेहल निकम, कु. तनुजा शेंडगे या सहा विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. डॉ अनिल पाटील, सचिव प्रिं. डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रिं. डॉ. बाळ कांबळे, बँकिंग विभागाचे विभाग प्रमुख व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे स्वायत्त महाविद्यालय असून ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करता यावे यासाठी बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवले जाते. या केंद्राच्या माध्यमातून बँक क्लर्क, बँक ऑफिसर, बँक स्पेशालीस्ट ऑफिसर, एल.आय. सी. व जी. आय. सी. मधील असिस्टंट, प्रशासकीय अधिकारी भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षेचे उत्तम मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये नाममात्र फी मध्ये सुसज्ज अभ्यासिका व संगणक लॅब देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर केंद्रामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुबई, पुणे, जयपूर, वाराणसी येथील तज्ञ मार्गदर्शकांना निमंत्रित केले जाते. गाडगीळ महाविद्यालयातील हे बँकिंग स्पर्धा परीक्षा केंद्र पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्तम केंद्र असून ग्रामीण भागातील युवक-युवतींना बँकिंग मध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक सेवा-सुविधा पुरवण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य हे महाविद्यालय करत आहे.