maharashtra

एसटी च्या संपामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हाल


Educational condition of students with passengers due to termination of ST
गेल्या दीडदोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये सुरू झाली.  प्रत्यक्ष वर्गात अध्ययन अध्यापन होत असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकवर्गही जोमाने कामाला लागला, दिवाळीच्या सुट्टी नंतर विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचे नियोजनही केलेले होते, मात्र एसटी बसेसच्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात येणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा विदयार्थ्यांना ऑनलाइनच परीक्षा द्याव्या लागत आहेत.

पुसेगाव : कोरोनामुळे विस्कटलेली शैक्षणिक घडी आत्ताकुठे सावरत असताना एसटीच्या संपाचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे. शाळा महाविद्यालयापर्यंत ये जा करता येत नसल्याने प्रत्यक्ष अध्ययनाचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येत नसून दिवाळी नंतर होणाऱ्या प्रथम सत्र परीक्षाचे वेळापत्रक ही कोलमडून गेले आहे, हा संप कधी मिटणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या दीडदोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये सुरू झाली.  प्रत्यक्ष वर्गात अध्ययन अध्यापन होत असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकवर्गही जोमाने कामाला लागला, दिवाळीच्या सुट्टी नंतर विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचे नियोजनही केलेले होते, मात्र एसटी बसेसच्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात येणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा विदयार्थ्यांना ऑनलाइनच परीक्षा द्याव्या लागत आहेत. मात्र सातत्याने मोबाईल नेटवर्क मध्ये अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी शासनाने या संपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी अपेक्षा विद्यार्थी व पालक करत आहेत.