educationalconditionofstudentswithpassengersduetoterminationofst

esahas.com

एसटी च्या संपामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हाल

गेल्या दीडदोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये सुरू झाली.  प्रत्यक्ष वर्गात अध्ययन अध्यापन होत असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकवर्गही जोमाने कामाला लागला, दिवाळीच्या सुट्टी नंतर विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचे नियोजनही केलेले होते, मात्र एसटी बसेसच्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात येणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा विदयार्थ्यांना ऑनलाइनच परीक्षा द्याव्या लागत आहेत.