maharashtra

दिव्यांग व ज्येष्ठांनी कृत्रिम अवयव व साधने आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घ्या : विनय गौडा


Disabled and seniors benefit from artificial limbs and devices and National Age Plan: Vinay Gowda
सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविणे या केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अस्थिव्यंगाकरिता मंत्रालयाच्या व राष्ट्रीय वयोश्री योजना या योजनेद्वारे जिल्हा प्रशासनाकडून लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.

सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविणे या केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अस्थिव्यंगाकरिता मंत्रालयाच्या व राष्ट्रीय वयोश्री योजना या योजनेद्वारे जिल्हा प्रशासनाकडून लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.
यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी  जि. प. सपना घोळवे उपस्थित होत्या.
विनय गौडा म्हणाले, या  योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना गरजेनुसार व अलिम्को कानपूर, उत्तरप्रदेश येथील तज्ञांच्या सल्ल्याने तीन चाकी सायकल, व्हील चेअर, मोटारइज्ड ट्रायसायकल, कॅलिपर्स, कुबड्या, कृत्रीम हात-पाय, श्रवणयंत्रे, विविध प्रकारच्या काठ्या,  ब्रेल कीटस्, एम. आर. किटस्, नंबरचा चष्मा, स्मार्ट फोन इत्यादी कृत्रीम अंग व साधने जिल्हा प्रशासन, सातारा व जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त  प्रयत्नाने मिळवून देण्यात येणार आहे.
ही कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करुन घेण्यासाठी संबंधीत लाभार्थ्यांने नागरी सुविधा केंद्राकडे नाव नोंदणी करुन घ्यावी, त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रक आवश्यक आहेत.
दिव्यांगाकरिता :  सिव्हील सर्जन यांचा दिव्यांगत्वाचा वैद्यकीय दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार/ तलाठी/ नगरसेवक) वार्षिक उत्पन्न रु. 180000/-, दोन पासपोर्ट साईज फोटो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी : आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार/ तलाठी/ नगरसेवक), दोन पासपोर्ट साईज फोटो, वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा जास्त, वार्षिक उत्पन्न रु. 180000 पर्यंतच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोन टप्प्यात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
पहिला टप्पा
1. सातारा तालुका : 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 15 डिसेंबर 2021, दिव्यांगाकरिता दि. 16 डिसेंबर 2021
2. कराड तालुका : दिव्यांगाकरिता दि. 17 डिसेंबर 2021, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 18 डिसेंबर 2021
3. फलटण तालुका : दिव्यांगाकरिता दि. 19 डिसेंबर 2021, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 20 डिसेंबर 2021
4. वाई तालुका : दिव्यांगाकरिता दि. 21 डिसेंबर 2021, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 22 डिसेंबर 2021
5. महाबळेश्वर तालुका : दिव्यांगाकरिता दि. 23 डिसेंबर 2021, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता दि. 24 डिसेंबर 2021
 दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 28 जानेवारी 2022 पासून उर्वरित तालुक्यांमध्ये मोजमाप शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.