पोलीस असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात भामट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पोलीस असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात भामट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास गुरुदत्त कॉलनी, शाहूनगर, गोडोली, सातारा येथून विजया शामराव पवार रा. श्री दत्त कॉलनी, शाहूनगर सातारा या रस्त्यावरून पायी चालत जात असताना एका अनोळखी इसमाने थांबवून मी पोलीस आहे. पुढे कोयता वार होत आहेत. तुमचे दागिने पर्समध्ये ठेवा, असे सांगितले. त्यानुसार पवार यांनी त्यांच्या गळ्यातील चेन काढून कागदात ठेवून तो कागद त्याच्याकडे दिला. त्यादरम्यान त्या इसमाने आणखी एका दिवसात इसमास थांबवून त्याच्याकडूनही सोन्याचे दागिने काढून घेतले व त्याने दुसऱ्या दुचाकी स्वारास पुढील चौकात सोडा, असे म्हणून ते दोघे तिथून निघून गेले. त्यावेळी पवार यांच्या लक्षात आले की या दोघांनी संगनमत करून त्यांची 28 हजार रुपये किंमतीची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन फसवणूक करून चोरून नेली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करीत आहेत.